स्वारगेट बस स्टॅन्डमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार; वसंत मोरेंकडून सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड

Facebook
Twitter
WhatsApp

शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उबाठा गटाचे नेते वसंत मोरे व त्यांच्या समर्थकांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा रक्षक कार्यालयात शिरुन तेथे तोडफोड केली. स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करण्याची घटना समोर आली. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी यातील आरोपी निष्पन्न केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज दुपारी स्वारगेट बसस्थानकाला भेट देऊन सर्व माहिती घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वसंत मोरे व त्यांचे कार्यकर्ते स्वारगेट बसस्थानकात पोहचले. त्या ठिकाणी कपडे, दारुच्या बाटल्या, कंडोम अशा वस्तू सापडल्या. बंद पडलेल्या बसमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या. त्याबाबत विचारणा केल्यावर कोणीही उत्तरे देण्यास तेथे नव्हते. त्यामुळे वसंत मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षक कार्यालयातील काचा फोडल्या. हा प्रकार घडल्यापूर्वी काही वेळ अगोदर अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वारगेट बसस्थानकात उपस्थित होते. परंतु, वसंत मोरे व त्यांचे कार्यकर्ते तोडफोड करत असताना त्यांच्या आजू बाजूला कोणीही पोलीस दिसून येत नव्हते की त्यांना तोडफोड करण्यापासून कोणीही रोखले नाही. हा प्रकार मीडियातून पोलिसांना समजल्यानंतर समोरच असलेल्या पोलीस ठाण्यातून पोलिसांनी धाव घेतली. (Pune Crime News) यावेळी बोलताना वसंत मोरे यांनी सांगितले की, हा आरोपी गेले पाच दिवस येथेच झोपत होता. तरी त्याला कोणी कसे अडवले नाही. येथे अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. त्याची जबाबदारी कोण घेणार. सुरक्षा रक्षक व आगार प्रमुखांना निलंबित केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags