शिंदवणे येथे उपसरपंच पदी भाग्यश्री शिंदे यांची बिनविरोध निवड*

Facebook
Twitter
WhatsApp

 

शिंदवणे गावात ६२ वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळाली.! – प्रा. सदाशिव कांबळे

 

*शिंदवणे गावातील जनतेला सोबत घेऊन विकासात्मक यंत्रणा राबवली जाईल.! – गणेश महाडीक*

 

*सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे उपसरपंच पद निवडीचा कार्यक्रम ग्राम विकास अधिकारी राजेंद्र जगताप, विद्यमान सरपंच सारीका दिनानाथ महाडीक आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*

*यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केला असता, प्रतिस्पर्धी दुसरा अर्ज नसल्यामुळे सर्वानुमते बिनविरोध उपसरपंच पदी अनुसूचित जाती प्रवर्गातील तथा बौद्ध उमेदवार ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री विनोद शिंदे यांची निवड झाल्याचे ग्राम विकास अधिकारी जगताप यांनी जाहीर केले. निवड होताच उपस्थित मान्यवर व नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.*

*याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना स्थानिक नागरिक प्रा. सदाशिव कांबळे बोलताना म्हणाले की, ‘शिंदवणे गावात ६२ वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाला संत यादव बाबा ग्राम विकास पॅनलने संधी दिल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक करतो. बहुजन पॅटर्न शिंदवणे गावात राबवला जातो. सर्व समाजाला समान संधी दिली जाते. समाज घटकांना सोबत घेऊन विकासात्मक कार्यक्रम राबवला जातो. गावचा विकास करणे हेच ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष असते. विविध विकासकामे करुन सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. भावी काळात विकासाचीच दृष्टी ठेऊन अनुसूचित जाती तसेच सर्व स्तरातील घटकांचा विकास ग्रामपंचायत शिंदवणे सरपंच तसेच इतर सदस्यांकडून साधला जावा, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले.’*

*माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश महाडीक बोलताना म्हणाले की, ‘शिंदवणे गावचा विकास करणे हेच आमचे धोरण आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक यंत्रणा राबवली जाते. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आम्ही सक्रिय कार्य करत असतो. महापुरुषांच्या विचारांचा आशीर्वाद घेऊन पॅनल तसेच पदाधिकारी अन कार्यकर्ते काम करत असतात. शिंदवणे गावात विविध विकासकामे करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन महाडीक यांनी उपस्थितांना केले.’*

*यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, संचालक संतोष आबा कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच अमित बाबा कांचन, माजी सरपंच संजय डोंबाळे, माजी सरपंच मनिषा आण्णा महाडीक, माजी उपसरपंच सागर खेडेकर, योगेश कुलाळ, ज्योती महाडीक, माजी उपसरपंच कमल शिंदे, लता माने, ग्रामपंचायत सदस्य ओंकार मांढरे, प्रमिला शितोळे, संगीता महाडीक, शोभा महाडीक तसेच भुजंग महाडीक, रामभाऊ महाडीक, सुदाम महाडीक, अशोक कांबळे, महादेव लगाडे, भाऊसो. कांबळे, अक्षय शिंदे, संदीप बडेकर, केतन निकाळजे, अमोल गायकवाड, विनायक मुसळे, शेखर शिरवाळे, प्रदीप देशमुख, बाबुराव शेख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags