
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
“आरक्षणाची मर्यादा ओलांडली नसलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घ्याव्यात” या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच निवडणूकवेड तुफान वेगाने पसरत असून उमेदवारांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे.
उमेदवारांनी गाठीभेटी, घोंगडी बैठका, यात्रांचे आयोजन, आरोग्य शिबिरे, भेटवस्तू वाटप आणि सोशल मीडिया मोहीम जोरात सुरू केल्या असून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीत कोण मागे राहू नये याची सतत धडपड सुरू आहे.
😓 अडचण उमेदवारांची नाही… खरी अडचण कार्यकर्त्यांची!
प्रचार तेजीत असताना सर्वात अवघड परिस्थिती कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली आहे.
कारण —
🔹 सर्वच उमेदवार नात्यातले / मित्र / गावातील / जवळचे
🔹 सर्वांनी जवळीक साधलेली व विश्वास टाकलेला
🔹 सर्वांची कृतज्ञता व उपकार मनावर
परिणाम —
👉 कोणाचे काम करावे हा प्रश्न कधी नव्हे इतका मोठा झाला आहे.
आज कार्यकर्ते “तुमच्यासोबतच आहे!” हा शब्द सर्व उमेदवारांना देत आहेत; पण
📌 प्रत्यक्ष निवडणूक तापली की बाजू बदलता येणार नाही
📌 एकाला साथ दिली की दुसऱ्याचा राग अपरिहार्य
📌 तटस्थ राहिले तर दोन्हीकडून संशयाची नजर
म्हणूनच कार्यकर्त्यांची अवस्था —
⚔️ “इकडे आड– तिकडे विहीर”
🔥 आणखी एक धक्का — पुढे ग्रामपंचायतीची निवडणूकही!
इथेच खरी गुंतागुंत सुरू होते —
👉 काही दिवसांतच ग्रामपंचायत निवडणुका देखील घेण्यात येणार आहेत.
याचा अर्थ —
📌 सध्याच्या जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकांमधील मैत्री, वैर, गटबाजी, तडजोडी
एकदम पुढील ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम करणार आहेत.
यामुळे कार्यकर्त्यांच्या डोक्याला आणखी ताण —
🔸 आत्ता एकाची साथ केली तर गाव निवडणुकीत त्याचा उलट प्रभाव होणार का?
🔸 सध्याची बाजू निवडली तर पुढच्या गावच्या निवडणुकीत स्थानिक समीकरण बिघडणार का?
म्हणूनच राजकीय वर्तुळात एकच मत व्यक्त होत आहे —
💭 “ही निवडणूक जिंकली तरच पुढच्या ग्रामपंचायतीची पायाभरणी होईल.”
🧭 ‘निवडणुक कार्यक्रम लागताच दिशा ठरेल’ — तटस्थ आशेचा सूर
कार्यकर्त्यांच्या मनात सध्या एकच आशा —
🗳️ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की समीकरणे स्पष्ट होतील.
त्या वेळी —
📌 उमेदवारी अंतिम
📌 गटतट निश्चित
📌 प्रचार यंत्रणा ठरलेली
आणि मग कार्यकर्त्यांनाही मार्ग सापडेल — अशी मानसिक समजूत प्रत्येक जण स्वतःला घालत आहे.
या निवडणुकीत —
👤 उमेदवार लढत आहेत
पण
💪 खरी कसोटी तर कार्यकर्त्यांची आहे.
चुकीचा झेंडा उचलला तर नाती जाईल,
बरोबर झेंडा घेतला तर भविष्य उजळेल.
म्हणूनच आज संपूर्ण पंचक्रोशीत एकच प्रश्न घुमतोआहे
🔥 “कोणता झेंडा घेऊ हाती?”









