देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे नरेंद्र मोदी हे तब्बल तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत त्यांच्यासह इतर खासदारांनी शपथ घेतली. मात्र खाते वाटपा आधीच एका खासदाराने मला मोकळं करा असा आवाहन सरकारला केले असल्याची माहिती समोर आली आहे.
केरळच्या त्रिशूल लोकसभा मतदारसंघातून गोपी सुरेश यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे त्यानंतर आता काल शपथविधी देखील झाला आहे .मात्र गोपी सुरेश यांना राजीनामा द्यायचा आहे केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिपद नको असल्यास सांगितला आहे.
*मला कॅबिनेट मंत्रीपद नकोय*
माध्यमांसोबत बोलत असताना सुरेश यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की मला आशा आहे की मला केंद्रीय मंत्रिमंडळातून मुक्त केले जाईल. केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय घेऊ दे खासदार म्हणून त्रिशूलमध्ये मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करेल मला कॅबिनेट मंत्रीपद नकोय असं सुरेश गोपी म्हणाले आहेत. सुरेश हे त्रिशूल मधून भाजपचे एकमेव निवडून आलेले खासदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं ॲक्शन हिरो असलेल्या गोपी यांनी भाजपच्या तिकिटावर त्रिशूलमध्ये मोठा विजय मिळवत केरळमध्ये भाजपसाठी इतिहास घडवला असल्याचा दिसून आलं .केरळमध्ये अनेक दशकांपासून भाजप एक तरी उमेदवार निवडून येईल यासाठी झटत आहे. शेवटी सुरेश यांनी केरळ मधून खासदार म्हणून विजय मिळवलाच . मात्र तरीही त्यांच्या राजकीय कारकीर्दीत चढउतार पाहायला मिळत आहे.सुरेश यांनी सुरुवातीला मंत्रिपद मिळवण्यासाठी नकार दिला होता .रविवारी त्यांना नरेंद्र मोदी यांचा फोन आला. आणि ते ताबडतोब दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली.
देवेंद्र फडवणीस यांच्यानंतर सुरेश यांनी म्हटलं “मला मोकळं करा”
सुरेश यांनी मला मोकळं करा असं का म्हटलं आहे आता त्याचं कारण समोर आल आहे .ते म्हणाले की मला माझे अर्धवट उरलेले चित्रपट पूर्ण करायचे होते
त्यासाठी मला मंत्रिमंडळातून मोकळं करा असा आवाहन सुरेश यांनी केला आहे. दरम्यान याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राज्यात महाविकास आघाडीचा झालेला विजय जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मला पदावरून मोकळं करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष श्रेष्ठींकडे विनंती केली आहे.