महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणाकरीता अर्थसहाय्याच्या असलेल्या योजनांच्या लाभ घेण्यासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (१० लाखापर्यत), गट कर्ज व्याज परतावा (५० लाखापर्यंत), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा (१० लाखापर्यंत) व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा (२० लाखापर्यंत) योजना राबविण्यात येतात. व्याज परतावा योजनेत बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्क्यापर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज करतांना आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, वीजदेयक, करभरल्याबाबतची पावती, रहिवासी दाखला, बँक पासबुक, उत्पनाचा दाखला, जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावा आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करावी.

 

  1. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे समक्ष किंवा कार्यालयाचा दूरध्वनी ०२०-२९५२३०५९ किंवा dmobcpune@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags