राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (ता. हवेली) : चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे २६ जून २०२५ रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करून नशा मुक्त समाजाच्या दिशेने पावले उचलणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माननीय मुख्याध्यापक श्री. राजाराम काकडे, पर्यवेक्षक श्री. जठार सर, समन्वयक व ज्येष्ठ शिक्षक श्री. शिंदे सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे कृष्णा बाबर सहा पोलीस निरीक्षक,
रूपाली जाधव पोलीस उपनिरीक्षक, रामदास मेमाणे, सहा पोलीस फौजदार, दिगंबर जगताप पोलीस हवालदार, ज्योती नवले पोलीस हवालदार, वैशाली नागवडे पोलीस हवालदार पोलीस मित्र संतोष गायकवाड सहभागी झाले होते.
श्रीमती ज्योती नवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे महत्त्व आणि समाजावर होणारे परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. कृष्णा बाबर साहेब यांनी भूषवले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मकता, शिस्त आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर गावामध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधन करणारे फलक आणि घोषणा देत समाजात जनजागृती निर्माण
केली.