राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
आव्हाळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आव्हाळवाडी व माळवाडी या दोन्ही शाळेत रिच फौंडेशन व आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन काकासाहेब रामराव सातव पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ७५० रुपये किमतीचे शालेय दप्तर,शालेय वह्या, कंपासपेटी ,चित्रकला वही, कलर बॉक्स,गोष्टीची पुस्तके इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य व ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन आदरणीय काकासाहेब सातव पाटील,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश दादा कुटे,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुटे,ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक विजय रामराव सातव पाटील ,गणेश पॅकेजिंग कंपनीचे मालक गणेश अमृतराव सातव पाटील माजी उपसरपंच पिराजी आव्हाळे पाटील,माझी तंटामुक्ती उपाध्यक्ष पंकज आव्हाळे पाटील,माजी उपसरपंच प्रशांत सातव पाटील सोमनाथ भिकोबा आव्हाळे पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष आव्हाळे पाटील,उपाध्यक्ष गणेश साळुंके ,माळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका माया तांबे , मुख्याध्यापक साळवे , सर्व शिक्षक वृंद तसेच रिच फाउंडेशन चे अश्विनी सिंगल ,राजीव लोचन ,नितीन खलाटे ,जितेंद्र मोहन ,मेघा मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना जितेंद्र मोहन सर, नितीन खलाटे ,विक्रम कुटे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निस्वादे शिक्षक व कुरंदळे शिक्षिका यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक साळवे यांनी मानले.