जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर च्या विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादित केलेले आहे .याच शाळेतील खो -खो चा संघ हवेली तालुकास्तरावरती पात्र ठरलेला आहे .लवकरच हा संघ तालुकास्तरीय स्पर्धेत खो-खो खेळणार आहे. या स्पर्धेतील सहभागी होणारे खेळाडूंना सुजित तात्यासाहेब काळे यांच्याकडून टी-शर्ट चे वाटप करण्यात आले व प्रोत्साहन शुभेच्छा देण्यात आल्या. श्री रणजित काळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , शाळेचे मुख्याध्यापक श्री सातपुते सर , श्री सुर्यवशी सर सर्व शिक्षक वृंद शाळा थेऊर यांचे तर्फ सुजित तात्यासाहेब काळे मित्र परिवाराचे आभार मानले.व खो खो संघ विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.