राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे प्रतिनिधी
एंजल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख आदर्श शिक्षक भाऊसाहेब यशवंत महाडिक यांना पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
भाऊसाहेब महाडिक हे एंजल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी तालुका, जिल्हा, विभागीय तसेच राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांनी स्वतःही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेक बक्षिसे व सन्मान मिळविले आहेत. सध्या ते हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव व हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याध्यक्ष जे. के. थोरात, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के. एम. ढोमसे, गटविकास अधिकारी जीवन कोकणे, शिवव्याख्याते गुलाब बाणखेले, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज घोलप, प्रवक्ते अशोक नाळे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य उदय पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप थोपटे, प्राचार्य नितीन बाणखेले, नानासाहेब गायकवाड, सहसचिव उत्तमराव आवारी, तसेच सोमनाथ भांडारे, स्नेहल बाळसराफ, यादव चासकर, तानाजी झेंडे, राजेंद्र पडवळ, ज्योती दहितुले, स्वाती उपार आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब महाडिक यांचा हा सन्मान म्हणजे शिक्षकांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही नेतृत्व करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य कसे करावे, याचे उत्तम उदाहरण आहे.