यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल थेऊरच्या वतीने ग्रंथदिंडी द्वारे थेऊर गावात ग्रामप्रदक्षिणा.

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहितटाइम्सन्यूज नेटवर्क

 

थेऊर दि. २८

विठुरायाच्या भेटीला  श्रीक्षेत्र देहू वरून संत तुकाराम महाराजांची पालखी चे प्रस्थान झालेले आहे. विठोबा रखुमाई च्या जयघोषात  प्रस्थान झालेले आहे. महाराष्ट्रातील आषाढी वारीचे आकर्षण जगभर आहे. याच पायी वारीची अनुभुती बाल मनाला व्हावी. या उद्देशाने श्रीक्षेत्र थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने थेऊर गावामध्ये ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीमध्ये वारकऱ्यांच्या पोशाखात विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.  पारंपारीक पोशाखात शिक्षक वृंद देखील सहभागी होता.

ज्ञानेश्वर माऊली वाय सी एम सावली असा जयघोष करत संपूर्ण थेऊर गावाला ग्राम प्रदक्षिणा घालून ही ग्रंथदिंडी विठ्ठल रुखमाई मंदिर चौकामध्ये आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला ग्रामस्था़ंनी भरभरून दाद दिली. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून ही दिंडी पुन्हा स्कुलमध्ये नेण्यात आली.

यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका कुमोदिनी वाघमारे मॅडम यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका आडावतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रंथ दिंडी   पार पडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग व स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags