क्रिडा शिक्षक भाऊसाहेब महाडिक यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
शिंदवणे दि. ८ सप्टेंबर २०२५
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोहळा रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय, खेड येथे संपन्न झाला. खेड तालुका माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षकेत्तर संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर अध्यक्षस्थानी होते. तर खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नायकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जि.प. सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, भगवान पोखरकर, तनुजाताई घनवट, डाएट पुणे प्राचार्य पी. शेंडकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच अमोल पवार, अरुण चांभारे, विजय शिंदे, अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, अनिल राक्षे, सुधीर मुंगसे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष उत्तम पोटवडे, सचिव रामदास रेटवडे, विश्वस्त मधुकर नाईक, कार्याध्यक्ष संजय बोरकर, बाळासाहेब वायकर, विलास आदलीग, दत्तात्रय येवले, अरविंदर गवळे, योगेश माळशिस्कार, संतोष काळे, सुनिल कड, सुर्यकांत मुंगसे, भोलेनाथ कड, लतीफ शेख, शिंदवणे विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजी महाडिक, महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य गोविंदराव जाधव, संजय टिमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना रामदास रेटवडे यांनी केली, सूत्रसंचालन प्रवीण काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन उत्तम पोटवडे यांनी मानले.
भाऊसाहेब महाडिक यांच्या या सन्मानाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढमाले, माजी कृषी पर्यवेक्षक संजय टिळेकर, ग्रामपंचायत माजी सदस्य शरद खेडेकर, कोरेगाव मूळ सोसायटीचे अध्यक्ष अमित सावंत, रामलाल तांबे, भाऊसाहेब कांचन यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags