लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क 

दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी इंग्लिश मिडीयम स्कूल लोणी काळभोर मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या दोन थोर पवित्र प्रतिमेचे पूजन *विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे. पी .डी व इन्चार्ज इनामदार मॅडम यांनी सर्व* शिक्षक शिक्षिका यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या इयत्ता पाचवी व तिसरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे करून या दोन थोर महापुरुषांच्या जीवनाला उजाळा आणला. *शिक्षक मनोगत* मध्ये विद्यालयाच्याशिक्षिका *सौ. शेलार. डी एस.व राईपुरे रुपाली यांनी विद्यार्थ्यांना या दोन थोर महापुरुषांविषयी उत्तम माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी आदरणीय मुख्याध्यापिका सौ शेवाळे पी.डी यांनी.* विद्यार्थ्यांना उत्तम *मार्गदर्शन* केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम *सूत्रसंचालन* *सौ. वैरांकर रुपाली.* यांनी केले.तसेच पूजा शर्मा यांनी आभार मानले .सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags