राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर : स्वच्छतवारी घरोघरी
सोरतापवाडी : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर सोरतापवाडी येथे दि. ३ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत आयोजित केले आहे.शिबीरामध्ये श्रमसंस्कार करताना स्वयंसेवकले आहे. या शिबीराच्या तिसर्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी सोरतापवाडी येथे संपूर्ण गावातून स्वच्छता केली. प्लॅस्टिक मुक्ती साठी स्वयंसेवकानी प्रबोधन केले. यामध्ये शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी गावातील मुख्य चौक, मंदिर ते मुख्य रस्त्याच्या दुतर्फा स्वागत कमानी पर्यंत स्वच्छता केली.

स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. गावातील मुख्य रस्त्यावरुन प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे संदेश देणार्या घोषणा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. संभाजीराव निकम म्हणाले की, ‘सोरतापवाडी येथे समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हे श्रमसंस्कार शिबीराचे दुसरे वर्ष आहे.सोरतापवाडी हे गाव आदर्श गाव असून या गावात शिबीर होणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
यावेळी प्रा. सौ. गितांजली चव्हाण, प्रा.सौ. पी.एम.खनुजा, प्रा. गणेश गाडेकर आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.









