लग्नानंतरही पोलीस शिपाई पदास गवसणी: थेऊर येथील हर्षाली चित्तारे यांची पुणे शहर पोलीस दलात निवड.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
थेऊर: थेऊर ता. हवेली येथील हर्षाली योगेश चित्तारे यांची अगदी कठीण परिसरातून परिश्रम करून पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस दलामध्ये शिपाई पदी निवड झाली.
लग्नानंतर पती, दोन मुले असा संसाराचा गाडा हाकत. स्वतः चिंचवड देवस्थान ट्रस्ट थेऊर येथे क्लार्क पदावर काम करून चिकाटीने अभ्यास व मैदानी सराव करून यश संपादन केले. थेऊर येथील कंद इमारतीत वास्तव्य करीत होत्या. या यशामागे त्यांना प्रोत्साहित त्यांचे मेहुणे पोलीस मित्र संतोष गायकवाड करीत होते. तर मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मारुती कांबळे हे करीत होते. थेऊर गावांमधून त्यांची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक व सत्कार करण्यात आला.