भोर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वस्तीगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात.

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे, दि. २९ : भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या वसतिगृहात इयता ८ वी ते १० वी, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बिगर व्यवसायिक, व्यावसायिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार आरक्षित टक्केवारीप्रमाणे त्या त्या प्रर्वगात गुणवत्तेनुसार मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, शैक्षणिक बाबींकरीता सहाय्य, निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात उपलब्ध असून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
0000

Tags