आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे काय तर आत्मविश्वास – विजयबापु शिवतारे

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क

  सासवड: नुकताच इ. दहावी व इ.बारावी चा निकाल लागला व पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झालेली आहे.या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी उजवलं यश संपादीत केले आहे.पुरंदर तालुक्यातील प्रत्येक विद्यालयामध्ये,ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यालयाचा गुणगौरव सोहळा सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात संपन्न झाला .या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धीवार यांनी केले होते.

या गुणगौरव सोहळ्याचे उदघाट्न दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मा.राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी केले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करीत असताना ते असे म्हंटले की माणसाला आयुष्यात महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे आत्मविश्वास! मी मोठा बनणारच. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फारशा सुविधा उपलब्ध नसतात,क्लासेस च्या सुविधा नसतात.अशा प्रतिकूल परिस्थितीतून या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे ही मोठी जमेची बाजू आहे.मी शाळेत असतांना खूप वांड होतो, पण तेवढाच हुशार देखील होतो.मला मराठी माणसातील धीरूभाई अंबांनी बनण्याची इच्छा होती व त्या दृष्टिकोनातून माझे सातत्याने प्रयत्न होते. गरीब पण होतकरू हुशार विद्यार्थ्यांची उच्च शिक्षन घेण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक दुर्बलता आहे अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करा,मी त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च करेल.माझ्या कार्यालयाशी संपर्क करा किंवा या कार्यक्रमाचे आयोजक पंकज धिवार यांचेशी करा ते माझ्या पर्यत पोहचवतील.

या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा म्हणजे विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करणे.यावेळी नामांकित अशा रयत प्रबोधिनी पुणे चे संचालक उमेश कुदळे यांनी करिअर विषयी मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी अनेक दाखले दिले व आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडायच्या याविषयी सोप्या व समजेल अशा शब्दात मार्गदर्शन केले. या गुनगौरव सोहळ्याचे आयोजक तथा रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अद्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविक केले.त्यावेळी ते असे म्हंटले की आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून व मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यातील करिअर संबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.जे बी काय करायचे ते सर्वोच्च करा असे ते यावेळी म्हंटले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे म्हंटले की तुम्ही खूप मोठे व्हा.पण सर्वोच्च पद भूषविताना आपल्या आई वडिलांना विसरू नका.मा.रामदास आठवले यांचेकडे केंद्रीय सामाजिक न्याय खाते आहे.त्या माध्यमातून मुलांना शिक्षणासाठी,परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी च्या विविध योजना आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.व्हेंचर कॅपिटल ही आठवले साहेब यांच्या खात्याची योजना आहे.ज्याच्या माध्यमातून नवनवीन व्यवसायासाठी अत्यल्प दरात 15 लाखापासून 15 कोटी पर्यत चे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.या योजनेचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वनपुरी हायस्कुल चे शिक्षक दत्ता रोकडे यांनी केले.विद्यार्थ्यांना व शाळा प्रतिनिधींना मान्यवरांकडून सन्मानचिन्ह,पेन व वही देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप नेवसे, पुरंदर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य सय्यद सर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे,युवानेते गौतम भालेराव,सामाजिक कार्यकर्ते भगवान दिखले हे देखील उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन अजय धिवार, प्रस्मित धिवार,बाळासाहेब धिवार,ओंकार धिवार,प्रतिक धिवार,अक्षय खवले,मनीष पवार, प्रवीण कांबळे,कोंडीबा कांबळे,राकेश कांबळे,युवराज धिवार,मयूर बेंगले,आकाश यादव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags