राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे प्रतिनिधी
पुणे महापालिका शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. ही स्पर्धा शुक्रवार (२२ ऑगस्ट) ते सोमवार (२५ ऑगस्ट) या कालावधीत वारजे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात झाली.या स्पर्धेत पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सह्याद्री नॅशनल स्कूल, सह्याद्री कुस्ती संकुल आणि कुस्तीगीर संघ पुणे शहर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत थेऊर (ता. हवेली) येथील पै. आयुष काळे याने ६८ किलो वजनी गटात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. आयुष हा सध्या पुण्यातील दि बिशप स्कूल कॅम्प, पुणे येथे शिक्षण घेत आहे.
कुस्ती ही आयुषला घराण्याची परंपरा लाभलेली आहे. त्याला लहानपणापासूनच कुस्तीची ओढ असून, त्याचे आजोबा यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक पैलवान पांडुरंग काळे, चुलते यशवंतचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, तसेच वडील मुंबई महापौर केसरी दत्तात्रेय काळे हे सर्व नामवंत कुस्तीगीर आहेत. या परंपरेतूनच आयुषला कुस्तीचे धडे मिळाले आहेत.
➡️ आयुषच्या या यशामुळे थेऊर गावासह संपूर्ण हवेली तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.