उरुळी कांचन (ता. हवेली) – विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवा भावी संस्था अंतर्गत साने संगीत क्लासेस व लोककला मंच यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील पठण व भीम गीतांनी झाली. त्यानंतर कलाविष्कारांतर्गत अभंग, पोवाडा, भाषणे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले.
यावेळी जि.प. प्राथमिक शाळा, उरुळी कांचन येथील गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव शिवराज ज्ञानोबा साने यांचे विशेष योगदान लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील तुपे, अमोल भोसले, भाऊसाहेब महाडिक, सुरेश वाळेकर यांची उपस्थिती होती.
संस्थेच्या अध्यक्षा रेखा साने, तसेच अर्चना हत्ती, वनिता पवार, पूजा कोटी, मोना घोडके या महिला कार्यकर्त्यांनी संयोजनात मोलाची भूमिका बजावली.
साने संगीत कला मंचचे विद्यार्थी कलाकार आरोही सोळंके, विकास साने, तनया वाल्हेकर, विनायक पवार, श्लोक घोडके, वैष्णवी साळुंके यांनी बहारदार सादरीकरण केले. विशेष सहकार्य दत्ता साळुंके यांचे लाभले.
या उपक्रमामध्ये बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.