थेऊर येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे, अंगणवाडी बालकांना गल्ल्यांचे वाटप
थेऊर (पुणे): विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी ‘आयुष सेवाभावी संस्था’ पुढे सरसावली असून, थेऊरमधील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील बालकांना बचतीची सवय लागावी, या हेतूने त्यांना गल्ल्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शैक्षणिक साहित्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असून, अभ्यासात अधिक मन लागेल, असे शिक्षक व पालकवर्गाचे म्हणणे आहे.
या कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील शिक्षण क्षेत्रासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे, राहुल कांबळे, माजी उपसरपंच भरत कुंजीर, नवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कुंजीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे, रामचंद्र बोडके, मयूर कुंजीर, गोरख काळे, सोमनाथ खंडागळे, गणेश चव्हाण, नाना शेडगे, मेहब्बुब सय्यद, रामदास चव्हाण, कैलास सावंत, अजय जाधव, सचिन चव्हाण, रामदास भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले, “गावातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे, हेच गावाचे उज्वल भविष्य निश्चित करणारे आहे. त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे, हे आमचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. या दिशा अधिक परिणामकारक उपक्रमांची हमी आम्ही देतो.”