पुर्व हवेली: ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी सकाळी योग दिन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले.
जागतिक योगा दिनानिमित्त लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सकाळी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योगा दिन साजरा केला. त्यावेळेस शाळाच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे पी.डी उपस्थित होत्या.
यावेळी शाळेचे पी टी शिक्षिका हर्षदा काळभोर यांनी , विद्यार्थांना प्रत्यशिके करून दाखवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीती कदम व रेणुका पवार यांनी केले .आणि श्र्वेता पवार यांनी आभार मानले .शिक्षक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. इयत्ता १ली ते १०वी चे सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
त्याचप्रमाणे श्री क्षेत्र थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हि योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपमुख्याधिपीका सौ.कुमुदिनी वाघमारे,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सौ.संगिता क्षीरसागर मिस यांनी विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.