राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी जय मल्हार नाट्यगृह जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे भीमरत्न विचारमंच जेजुरी आयोजित भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संघ नायक न्यूजचे संपादक प्रा. सदाशिव कांबळे आणि उपसंपादक शामराव जगताप यांचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त डाॅ. नारायण टाक, कार्यक्रम अध्यक्षा स्नेहल गौतम भालेराव यांच्या हस्ते ‘भीमरत्न गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.*
*भीमरत्न विचारमंच जेजुरी संस्था गेली १६ वर्षापासून विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा भीमरत्न पुरस्कार देऊन गौरव करत असते. या वर्षी भारतीय संविधान दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवानिमित्त पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कांबळे आणि जगताप यांना ‘भारतीय संविधान प्रत व सन्मान पत्र’ देत जेजुरी नगरीत विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.*
*याप्रसंगी प्रा. सदाशिव कांबळे प्रसार माध्यमांना बोलताना म्हणाले की, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी आणि महाराष्ट्राचे बहुजन कुलदैवत खंडोबा पवित्र नगरीत भीमरत्न पुरस्कार मिळणे म्हणजे संघ नायक न्यूज मिडीयाला प्रेरणा व ऊर्जा मिळणे होय. पत्रकारीता म्हणजे समाज जागृतीसाठी घेतलेली स्वयंदीक्षा आहे, या बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आम्ही सक्रिय कार्यरत आहोत, असे कांबळे यांनी मत व्यक्त केले.’*
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप जाधव, उपाध्यक्ष चक्रधर सोनवणे, सचिव पंढरीनाथ जाधव तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. जेजुरी तसेच पंचक्रोशीतील संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*