पूर्व हवेलीतील शिंदेवाडी-जगतापवाडीत शिव पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने खुले

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
शेतकरी, ग्रामस्थ व महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांना यश; सरपंच संदिप जगताप यांची माहिती

 

लोणीकंद (दि. २ जून २०२५) –

पूर्व हवेली तालुक्यातील शेती प्रधान भाग असलेल्या शिंदेवाडी-जगतापवाडी परिसरातील वहिवाट शिव पाणंद रस्ते ग्रामस्थ व शेतकरी वर्गाच्या सक्रिय सहभागातून खुले करण्यात आले आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप जगताप यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, हे रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने खुल्या करण्यात आले असून यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या कार्यात गावातील तरुण शेतकरी वर्ग, ग्रामस्थ, महसूल विभागाचे अधिकारी तसेच गावचे आजी-माजी पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी महसूल विभागाचे तलाठी संजय गारकर, सरपंच संदिप जगताप, शेतकरी गोरख शिंदे, सतीश शिंदे, मंगेश शिंदे, कैलास शिंदे, कुंडलिक शिंदे, बाळासाहेब शिंदे, राहुल सावंत, कुणाल शिंदे आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, या रस्त्यांची मोजणी करून तब्बल २० फूट रुंदीचे रस्ते निर्माण करण्यास शेतकऱ्यांनी एकमुखाने संमती दर्शवली. गावातील क्षेत्र रस्ते व पाणंद रस्ते खुले करण्याच्या महसूल खात्याच्या निर्णयाचे स्वागत करत सर्व शेतकऱ्यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.

या उपक्रमात चेअरमन हरिभाऊ शिंदे, दिलीप दत्तात्रेय शिंदे, माजी सरपंच बापूराव शिंदे, माजी उपसरपंच कैलास शिंदे, परशुराम शिंदे, सुनील शिंदे यांचाही सक्रिय सहभाग होता. सरपंच संदिप जगताप व तलाठी संजय गारकर यांनी रस्त्यांचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

“पूर्व हवेलीतील बहुतांश गावांचा आधार शेती असून, त्या दृष्टीने शिव वहिवाट पाणंद रस्ते खुली करणे ही काळाची गरज आहे. यामुळे शेतीच्या वाहतुकीसाठी आधारभूत सुविधा उपलब्ध होतात. महसूल खात्याचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो,” असे प्रतिपादन सरपंच संदिप जगताप यांनी केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags