पुणे – समाजकार्य, नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सागर राजगुरू यांची छत्रपती सेवा संघ या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संघाच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, विविध सामाजिक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सागर राजगुरू हे सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय असून, गरीब, वंचित व उपेक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांची संघटनशक्ती, स्पष्टवक्ता व्यक्तिमत्व आणि झपाटलेपणा या गुणांमुळे त्यांना ही जबाबदारी बहाल करण्यात आली आहे.
संघाच्या सर्व सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सागर राजगुरू यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संघाच्या विस्तारासोबतच युवकांना मार्गदर्शन, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता मोहीम आदी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सागर राजगुरू यांच्या अध्यक्षपदाची निवड ही छत्रपती सेवा संघच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार असून, समाजहिताच्या कार्यासाठी ही एक नवी दिशा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.