
आरोग्यदूत श्री युवराज नाना काकडे यांच्या पुढाकाराला यश
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
मौजे थेऊर, कोलवडी–साष्टे, नायगाव व हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठा त्रास होत होता. विशेषतः परिसरात बिबट्यांचा वाढता वावर आणि घडणारे हल्ले यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे जीवावर येत होते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सतत केली जात होती.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आरोग्यदूत व थेऊर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य युवराज नाना काकडे यांनी गेल्या 15 दिवसांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला.
याच अनुषंगाने काल सकाळी MSEB रास्तापेठ कार्यालयात मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बैकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले व तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.
👉 शेतकऱ्यांच्या योग्य मागणीची दखल घेत MSEB कडून तत्काळ कार्यवाही करण्यात आली आणि
👉 आजपासून दिवसा वीजपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू झाली.
💬 शेतकऱ्यांचा आनंद – मागणी अखेर पूर्ण
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची असलेली मागणी पूर्ण झाल्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद व दिलासा व्यक्त होत आहे. बिबट्याच्या भीतीशिवाय दिवसा शेतीकाम करता येणार असल्याने कृषी कामकाजाला गती मिळणार आहे.
🙏 शेतकऱ्यांकडून युवराज नाना काकडे यांना आभार
या उपक्रमासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आरोग्यदूत युवराज काकडे यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून विशेष आभार व्यक्त केले जात आहेत.
📌 आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक व ऐतिहासिक ठरला आहे.









