
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
📌 हवेली तालुका / प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी, मांजरी खुर्द आणि आव्हाळवाडी या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांपासून महिलावर्ग, विद्यार्थ्यांपासून जनावरांपर्यंत सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत थेऊरचे सदस्य तथा समिती अध्यक्ष श्री. युवराज हिरामण काकडे यांनी वन उपसंरक्षक, पुणे यांना सविस्तर निवेदन दिले असून बिबट्यांचा वाढता वावर असलेले ठिकाणे —
🔹 कोलवडी : गायखिंड वस्ती, शांतारामवाडी, नामाजी पाटील मळा
🔹 मांजरी खुर्द : VTP प्रकल्प परिसर
🔹 आव्हाळवाडी : ओमवेद स्कूल परिसर व इतर शेतसऱ्यां
— येथे पिंजरे तात्काळ बसवावेत तसेच सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे —
☑ गेल्या काही दिवसांत बिबट्यांकडून जनावरांवर हल्ले झाले असून काही प्राण्यांचा मृत्यू झाला
☑ नागरिक दिवसा-संध्याकाळी घराबाहेर पडण्यास घाबरतात
☑ विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे व शेतात जाणे धोकादायक ठरत आहे
☑ या तीनही गावांची एकूण लोकसंख्या अंदाजे १ लाखाहून अधिक असून घटना घडल्याशिवाय उपाययोजना सुरू होऊ नये अशी नागरिकांची भावना आहे
यानंतर प्रतिनिधींनी जिल्हा वनअधिकारी श्री. महादेवजी मोहिते साहेब यांचीही भेट घेऊन गंभीर परिस्थितीची माहिती दिली.
📌 यावर श्री. मोहिते साहेबांनी तात्काळ तालुका वनअधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
वन विभागाकडून लवकरच पुढील उपाययोजना अपेक्षित — 🔹 बिबट्यांची हालचाल असलेल्या भागात पिंजरे बसविणे
🔹 वनकर्मचारी गस्त पथके नियुक्त करणे
🔹 नागरिकांना सुरक्षा मार्गदर्शन
🔹 गावोगाव जागृती अभियान व आपत्कालीन हेल्पलाइन
स्थानिक नागरिकांनी राज्य व जिल्हा प्रशासनाकडे एकच मागणी केली आहे —
👉 “अपघात झाल्यावर नाही, त्याआधीच उपाययोजना करा.”









