ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे टीमची जिल्हाधिकाऱ्यांना भेट

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, ता. १४ : ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीम तर्फे आज पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डूडी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये येत्या २८ सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात व जनजागृतीपर पद्धतीने साजरा करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी डूडी यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करून सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित केल्या जातील.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख अमित कांबळे, श्रद्धा राठी, प्रणिता राठी, पूजा गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags