कुंजीरवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी: पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पुरस्कार प्रदान. 

Facebook
Twitter
WhatsApp

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती रुपेश उघाडे युवा मंच व कुंजीरवाडी ग्रामस्थ आयोजित जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पुणे सोलापूर रोड कुंजीरवाडी मोरया वन सोसायटी पासून ते कुंजीरवाडी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपा च्या पुनमताई सागर चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार वितरण , सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन असे कार्यक्रमाचे रूपरेषा होती.

 

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा च्या पुनम चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे होते.

प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव सेनेचे स्वप्निल कुंजीर, दैनिक पुढारी चे पत्रकार सिताराम लांडगे, पत्रकार गणेश धुमाळ,परिवर्तन सेनेचे अमोल लोंढे, बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट, रिपाई चे शक्ती बडेकर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संजय भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट योगेश काकडे, कुंजीरवाडी चे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, डाळिंब उत्पादक संघाचे गोरख घुले, बिवरी गावचे उद्योजक नितीन गोते, मातंग एकता आंदोलनाचे दिगंबर जोगदंड, पत्रकार हनुमंत सुरवसे , बीवरी गावच्या विद्यमान सरपंच उत्कर्षा गोते, सकाळच्या पत्रकार सुवर्णा कांचन रेखा तुपे, अंबिका थिटे आदी उपस्थित होते.

यावेळी लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना, आनंद वैराट यांनी सांगितले की , जयंती संयोजकाच्या वतीने दरवर्षी कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी न घेता स्वखर्चाने जयंती केली जाते.

समाजात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. हा कौतुकास्पद उपक्रम आहे.

जयंती महोत्सवाचे मुख्य संयोजक सहदेव खंडागळे व रुपेश उघाडे यांनी जयंती सोहळ्याच्या आयोजन केले होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश उघाडे , अमोल गोडगे , अनिरुद्ध दोडे, निखिल कुंजीर, राजू गायकवाड, निलेश पायगुडे, मोहन उकिरडे यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीकडून देण्यात आलेले पुरस्कार :

 

मा.श्री.दत्तात्रेय उर्फ बाळासाहेब चौधरी

सांप्रदायिक क्षेत्र

 

मा.सौ.सुवर्णा कांचन

पत्रकारिता

 

मा.श्री.शरद पुजारी पत्रकारिता

 

कु.देविदास कुंजीर

आरोग्य दूत

 

मा.श्री.विजय रणदिवे

पत्रकारिता

 

मा.श्री. सचिन धुमाळ

पत्रकारिता

 

डॉ. मेहबूब लुकडे

आरोग्यसेवा

 

सौ नूतन स्वप्नील कुंजीर

महिला सक्षमीकरण

 

मा.श्री. योगेश काकडे

कृषी क्षेत्र

 

श्रीमती दिपालीताई काटकर

आदर्श शिक्षिका

 

मा.श्री मयूर काळे

युवा उद्योजक

 

मा.श्री अमोल गोडगे

युवा उद्योजक

 

मा.श्री . निखिल कुंजीर

आदर्श शिक्षक

 

मा.श्री.अनिरुद्ध दोडे

सामाजिक क्षेत्र

 

सौ. अश्विनी शिंदे

आदर्श शिक्षिका

 

मा.श्री .श्याम शेठ यादव युवा उद्योजक

 

मा.श्री भाऊसाहेब महाडिक

(आदर्श क्रीडा शिक्षक)

 

मा.श्री प्रसाद नाळे

(युवा उद्योजक)

 

श्री सिद्धार्थ शंकर गायकवाड

बौद्धाचार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags