राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कुंजीरवाडी, ता. हवेली, दि. १७ मे (प्रतिनिधी) –कुंजीरवाडी ग्रामपंचायत, प्राची होप फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ गांधींभवन कोथरूड, आस्था फाऊंडेशन व अस्मिता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रेस्ट आणि सर्व्हायकल (गर्भाशय) कॅन्सर साठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायतने गावातील प्रत्येक महिलांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रभावी जनजागृती केली. या शिबिरात एकूण ६४ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली तर १८ महिलांची गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी HPV चाचणी घेण्यात आली.या शिबिरात प्राची होप फाऊंडेशनच्या डॉ. अनुराधा पाटणकर यांनी महिलांना इतर आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन केले. ४० वर्षांवरील महिलांची डिजिटल मॅमोग्राफी तपासणी पुढील टप्प्यात पुण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.शिबिरादरम्यान रोटरी क्लबच्या उज्ज्वला बर्वे आणि अस्मिता फाऊंडेशनच्या प्राची भावसार यांनी उपस्थित महिलांना कॅन्सरविषयी सखोल व सुलभ भाषेत माहिती दिली.त्यांनी
1. कॅन्सर म्हणजे काय,
2. ब्रेस्ट व गर्भाशयाच्या कॅन्सरची कारणे,3
3. प्राथमिक लक्षणे,
4. प्रतिबंधक उपाय
यावर चर्चा केली. उपस्थित महिलांना प्रश्न विचारून संवादात्मक पद्धतीने माहिती देण्यात आली व बक्षीसेही वाटण्यात आली. यामुळे सत्र अधिक प्रभावी व मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राम दातार व अरमीन जमशेदजी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे, सदस्य चंद्रकांत मेमाणे, संग्राम कोतवाल, सागर निगडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाप्पू घुले, मराठा महासंघ हवेली तालुका कार्याध्यक्ष गजानन जगताप, पत्रकार विजय रणदिवे, तसेच ग्रामपंचायत सदस्या साधना कुंजीर, राणी कोतवाल, निर्मला धुमाळ, अश्विनी धुमाळ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि गावातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही व प्रभावी नियोजनासह पार पडला.