
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर / प्रतिनिधी
चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य व शैक्षणिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे पत्रकार आनंद वैराट हे होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणजी चव्हाण व दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बापूसाहेब धुमाळ उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजाराम काकडे सर, पर्यवेक्षक जठार सर, शालेय व्यवस्थापन समितीचे समन्वयक जीवन शिंदे सर यांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

सुत्रसंचालन आणि स्वागतपर माहिती
समारंभाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
स्वागत व प्रस्तावना सौ. मोराळे मॅडम यांनी, सूत्रसंचालन सौ. नरवणे मॅडम यांनी, अनुमोदन श्री. केदारी सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. आव्हाड मॅडम यांनी केले.

ॲड. श्रीकांत ह़ोवाळ यांचे विद्यार्थी मनाला भिडणारे व्याख्यान
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट श्रीकांत ह़ोवाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंचा प्रभावी आढावा घेतला.
त्यांनी —
🔹 बाबासाहेबांचे बालपण व शैक्षणिक संघर्ष
🔹 सामाजिक अडचणींतून शिक्षणाचे शस्त्र हातात घेऊन उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व
🔹 भारताच्या संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदान
🔹 समानता, मानवाधिकार व सामाजिक न्यायाचा संदेश
या सर्व विषयांवर प्रेरक, प्रवाही व माहितीपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन केले.
श्रीकांत ह़ोवाळ यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे विद्यार्थी व शिक्षक संपूर्ण वेळ एकाग्रतेने व उत्साहात ऐकत राहिले. थंडी असतानाही मोठ्या संख्येने विद्यार्थींची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष दैनिक पुढारीचे पत्रकार आनंद वैराट यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांची विचारधारा आचरणात आणण्याचे आवाहन केले.
शिक्षण, समानता, मानवता आणि संविधानिक मूल्ये आयुष्यात जगणे — हेच बाबासाहेबांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.









