
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यदूत श्री युवराज हिरामण काकडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत, समाजसेवेचा भाग म्हणून, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकामी मदत म्हणून, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,11,111 रु रकमेचा धनादेश, वर्षा या शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रोहिदास उंद्रे, संदीप पवार, रमेश उंद्रे उपस्थित होते.
याप्रसंगी युवराज काकडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसानग्रस्त परिस्थिती सावरण्यासाठी एक कर्तव्य म्हणून हा धनादेश सुपूर्त केला तसेच अशा कामांमध्ये नेहमीच योगदान देण्याची भुमिकाही व्यक्त केली.
सन 2017 साली युवराज काकडे यांनी स्वतःच्या विवाह सोहळ्याचा खर्च टाळून, गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी म्हणून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षास, 50,000 रुपयांची मदत केली होती. तसेच त्यांच्या मित्र परिवारातील 9 लग्न सोहळ्यांमध्ये देखील अवाजवी खर्च टाळून, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी मित्रांना प्रेरित करून, रुग्णांच्या सेवेसाठी देणगी देण्यासाठी प्रयत्न केले होते.
तसेच 2019/20 साली सांगली, कोल्हापूरला आलेल्या महापुरावेळी देखील युवराज काकडे यांनी संवेदनशीलता दाखवत, सहकाऱ्यांसमवेत स्वतः जाऊन पुरग्रस्त नागरिकांना दिलासा देऊन, आपली सामाजिक जबाबदारी व कर्तव्याची भुमिका पार पाडली होती.
सामाजिक जाणिवेतून दिलेले हे योगदान नक्कीच प्रेरणादायी असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवली.









