
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
उरुळी कांचन : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक व राजकीय संघटनांतर्फे उरुळी कांचन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
भारतीय संविधानानुसार सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर चप्पल फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे थेट संविधानावर हल्ला असल्याचे मत निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले. “आज देशातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहे?” असा सवाल करत ए.बी.एस. संघटनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष श्री. राजाभाऊ आडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, “देशातील सामान्य जनता रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि वाढत्या महागाईने त्रस्त आहे. या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी अशा कटकारस्थानांची मालिका रचली जात आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणातील आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा सरकारविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स, बहुजन जनता पक्ष, आणि रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी ऑफ इंडिया यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
निवेदन देताना उपस्थित मान्यवरांमध्ये —
राजाभाऊ आडागळे, अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स पश्चिम महाराष्ट्र
भाऊसाहेब बडेकर, सामाजिक कार्यकर्ते
संजय बडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, उरुळी कांचन
प्रवीण बडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन प्रेसिडेंट पार्टी ऑफ इंडिया
विलास झोंबाडे, पुणे जिल्हाध्यक्ष, ए.बी.एस. क्रांती फोर्स
केरबा बाबर, प्रदेश उपाध्यक्ष, बहुजन जनता पक्ष
भारत लोणारी, पदाधिकारी, ए.बी.सी.डी. फोर्स
गणेश लोणारी, पदाधिकारी, ए.बी.एस. क्रांती फोर्स हे सर्वजण उपस्थित होते.









