राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे – जागतिक कामगार दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिक येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रुबी हॉल हॉस्पिटल मधील कामगार संघटना व म्हसोबा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या दिवशी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना स्नेहभावाने कॅडबरी वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश कामगारांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा होता. विविध विभागांतील डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि तांत्रिक कर्मचारी यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय मनमिळावू वातावरणात पार पडले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी कामगारांच्या सेवा आणि समर्पणाचे कौतुक करत, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रुग्णालय प्रशासनानेही समाधान व्यक्त केले असून, कामगार दिनाच्या निमित्ताने एक सकारात्मक ऊर्जा आणि सन्मानाची भावना सर्वत्र अनुभवता
आली.