राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कदम वाकवस्ती – साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती लहुजी शक्ती सेना व भगवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, “शासन आपल्या दारी” या लोकोपयोगी उपक्रमातून कदम वाकवस्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने झाली. या वेळी कदम वाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, उपसरपंच नाशिर पठाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, माजी सदस्य नितीन लोखंडे, युवा नेते ज्ञानेश्वर नामूगडे, सदस्य रुपाली काळभोर, स्मिता लोंढे, संघर्ष महिला समूह अध्यक्षा वैशाली सकट आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंतीसोबत लोकहिताचे कार्य
या विशेष उपक्रमात नागरिकांच्या आधारकार्डसंबंधी सर्व कामांची पूर्तता करण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना संदर्भात विधवा व वृद्ध महिलांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
रेशन कार्ड समस्यांवर तोडगा पुरवठा विभागाच्या सर्व्हर डाऊनमुळे व उत्पन्न मर्यादा (₹४४,०००) अडचणींमुळे अनेकांना रेशनकार्ड बाबत समस्या होत्या. या संदर्भात २०० ते २५० अर्ज स्वीकृत करण्यात आले. यावर लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष विजय विठ्ठल सकट यांनी अप्पर तहसीलदार सौ. तृप्ती कोलते यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पात्र नागरिकांना रेशनकार्ड सुरु करून ४४,००० उत्पन्न दाखला देण्याचे आश्वासन दिले.जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखीतळ येथे आयोजित या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कदम वाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे यांनी या उपक्रमातून अनेक स्थानिक समस्या उघडकीस आल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोडके व दीपक काळभोर यांनी केले.उपस्थित मान्यवरांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अभिजीत पाचकुडवे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आकाश मात्रे, रोहन सपकाळ, सुहास काळभोर, शब्बीर पठाण, अमर सोनवणे, सुजल शेंडगे, सागर भाले, मयूर सकट, कमलेश सकट, किरण मात्रे, वर्षा भिसे, शोभा सकट, निर्मला चांदणे, आरती मोरे, सविता मोरे, शिल्पा मात्रे, शुभांगी शिंदे, सीमा अडागळे, सुवर्ण मात्रे व इतर मान्यवरांचा समावेश होत