
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर प्रतिनिधी
श्रीक्षेत्र थेऊर येथे २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते झाले. याबाबतची माहिती दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. पै. दत्तात्रय (आबा) काळे यांनी दिली.
हा महोत्सव श्री यशवंत सहकारी साखर कारखाना शेजारील मैदानावर होणार असून, यात कृषी, औद्योगिक, गृहोपयोगी वस्तू, अॅटोमोबाईल्स, शेतकी अवजारे यांचे प्रदर्शन तसेच राज्यस्तरीय पशूपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सर्व शासकीय संस्था सहभागी होणार असून, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बैलांचा रॅम्प वॉक
महिलांसाठी सक्षमीकरण कार्यशाळा व उद्योजक विकास प्रशिक्षण
महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र खरेदी जत्रा
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
आरोग्य महायज्ञ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
रेशनकार्ड दुरुस्ती व आधारकार्ड नोंदणी शिबिर
विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्याखाली दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान कार्यरत असून, या महोत्सवाद्वारे शेतकरी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असे व्यासपीठ उपलब्धकरून देण्यात येणार आहे.









