उरुळी कांचनमध्ये साबणे पेट्रोलियम व पोलीस स्टेशनजवळ धोकादायक चेंबर; अपघाताची शक्यता.

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
उरुळी कांचन (ता. हवेली) : गावातील साबणे पेट्रोलियम व पोलीस स्टेशन जवळील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले चेंबर उघडे पडल्याने व त्याठिकाणी मोठा खड्डा झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दिवसा सुद्धा वाहनं व पादचारी जाताना त्रास होतो. मात्र रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला व दुचाकीस्वार यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत उरुळी कांचनकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “या ठिकाणी योग्य दुरुस्ती करून, चेंबर सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा इशारा नागरिकांनी दिलाआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags