वाघोली : वाघोली–केसनंद रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या कामाला गती देण्यासाठी शासन नियुक्त सदस्य तथा पुणे महानगरपालिका सदस्य शांताराम बापु कटके यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आंदोलन आणि केलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती अजितदादांना देण्यात आली. तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
अजितदादांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
या सकारात्मक प्रतिसादाबद्दल शांताराम बापु कटके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले असून, रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.