राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर, पुणे : यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेश (अराजकीय ग्राहक संघटना) यांच्या वतीने रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यस्तरीय कार्यशाळा, नियुक्ती समारंभ व द्विमासिक बैठक संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री. सूर्यकांत (आप्पा) गवळी यांच्या निवासस्थानी पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः गवळी सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सातव पाटील उपस्थित होते. या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी ग्राहक कल्याण, हक्क, कायदे व संघटनेची कार्यपद्धती यावर सखोल चर्चा केली. ग्राहकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी केंद्रांची उभारणी, महिलांची संघटना रचना, नियमावली, प्रोटोकॉल इत्यादी विषयांवर चर्चेअंती महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या कार्यशाळेत पुढील पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरावर नियुक्ती करण्यात आली:
ऍड. सौं. अनिता सूर्यकांत गवळी : महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष व ग्राहक आधार केंद्र राज्यप्रमुख
श्री. नंदकिशोर शेवाळे (नाशिक) : सोशल मीडिया व प्रशिक्षण प्रमुख
श्री. जोशी साहेब (धुळे) : विधी समिती प्रमुख
श्री. गणेश लाड (पालघर) : माहिती अधिकार व लोकसेवा हमी कायदा प्रमुख
ऍड. संस्कृती व ऍड. संस्कार गवळी : राज्य सल्लागार मंडळ
महसूल सहा विभाग व जिल्हानिहाय नियुक्त्या:
पूर्व विदर्भ : योगेश भागवतकर (यवतमाळ)
पश्चिम विदर्भ : भूषण वर्धे, उषाताई वनारे (अमरावती, बुलढाणा)
मराठवाडा : प्रा. कैलास अडकिनेसर (नांदेड)
पश्चिम महाराष्ट्र : डॉ. अनिल घोडके, प्रकाश पाटील (पुणे, सातारा)
कोकण विभाग : अमृतराव जाधव (रत्नागिरी), ऍड. मंदा सोनवणे-वर्धे, सौ. सुमन देसाई, सुरेश जेधे, सुहास राणे, चंद्रकांत जगताप (मुंबई, ठाणे)
राज्य कार्यकारिणी सदस्य:
भाऊसाहेब घोडके (बीड), दिलीप भोसले, मोहन गद्रे, सौ. संगीता बुधवंत (पुणे)
पुणे जिल्हा ग्रामीण नियुक्त्या:
सौ. कामिनी भोसले – प्रभारी अध्यक्ष
सौ. मयुरी भांडवलकर – प्रभारी संघटक
कार्यशाळेच्या समारोपात गवळी सरांनी स्पष्ट केले की,
> “ग्राहक शक्ती + शासन दंडशक्ती + लोकप्रतिनिधींचे सहकार्य + मीडियाशी सुसंवाद = शोषणमुक्त महाराष्ट्र”
हेच आमचे सूत्र असून, शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने लढा देण्याचा आमचा संकल्प आहे.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
जय ग्राहका! सत्यमेव जयते! जय महाराष्ट्र!!