मतमोजणी दिवशी शिरूर लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात नो पार्किंग झोन घोषित.

  पुणे, दि. २: शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम येथे दिनांक ४जून २०२४ रोजी होणार आहे. मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी चार ठिकाणी नो-पार्किंग झोन घोषित केला आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावरील राजमुद्रा चौक, रांजणगांव ते फलकेमळा, कारेगांव या…