आय.टी.आय. मध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन तरुणांनी करिअर घडवावे . मंत्री -मंगल प्रभात लोढा
पुणे, दि. १०: आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊनही तरुण पिढीला जर्मनी, जपान सारख्या देशात जाण्याची संधी मिळू शकते. अशा संधींचा लाभ घेऊन करिअर घडवावे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे आयोजित छत्रपती शाहू…