केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला दिली भेट.
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, आज 16 जून 24 रोजी पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला भेट दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वैकुंठ मेहता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. संस्थेच्याच्या संचालक डॉ.हेमा यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…