परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते’, कोर्टाचे चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क “मी कोर्टात मंत्री संजय राठोडांविरोधात लढत असताना पत्रकार सुपाऱ्या घेवून प्रश्नं विचारतात”, असा आरोप भाजपच्या चित्रा वाघांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. पत्रकार परिषदेत लढवय्याची भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघांच्याच वकिलांनी मात्र काल कोर्टात राठोडांविरोधातली केस माघारी घेण्याची भाषा केली. त्यावरुन चित्रा वाघांसारखे राजकारणी जनहित याचिकांद्वारे राजकारण करुन न्यायालयांना त्यात खेचतात, या शब्दात…