पोलीस असल्याचा बहाणा करुन महिलेचे 6 लाखांचे दागिने लांबविले; सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळील घटना
पुणे : पोलीस असल्याचा बहाणा करुन महिलांच्या दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम करीत असल्याचे भासवून हातचलाखी करुन महिलेच्या पर्समधील ६ लाख रुपयांचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंगणे येथील एका ५६ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंदाजे ५० व ४० वर्षाच्या दोघा चोरट्यांवर…