शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या मोटारसायकल चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून ६,६०,०००/ रू. किंमतीच्या मोटारसायकली जप्त

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या मोटारसायकल चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून ६,६०,०००/ रू. किंमतीच्या मोटारसायकली जप्त

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या मोटारसायकल चोरीचे 11 गुन्हे शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात आरोपी संतोष उर्फ शरद गजानन इंगोले रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम, याची दि. ०७/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. शिरूर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळी पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरी उघडकीस…

“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक

“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक

पुणेकरांच्या नादाला लागू नये असे म्हणतात ते उगाच नाही. पुणेकर कधीही इतरांची आरेरावी सहन करून घेत नाही, स्पष्ट शब्दात बोलतात आणि समोरच्याला त्याची चूक दाखवून देतात. पुणेकरांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते.मोजक्या शब्दात ते समोरच्याला त्याची चूक दाखवण्याचे कौशल्य अस्सल पुणेकरांकडे हमखास असते. अनेकदा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पुणेकर त्यांची पुणेरी शैली वापरताना दिसतात. बेशिस्त लोकांना…

पिंपरी : पोलीस चौकीत आरोपीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

पिंपरी : पोलीस चौकीत आरोपीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

पिंपरी : एक तरुण विनयभंगाच्या गुन्ह्यात फरार होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तरुण बेपत्ता असल्‍याची फिर्याद दिली होती. पोलीस त्‍याचा शोध घेत असल्‍याने तो स्‍वतः पोलीस चौकीत हजर झाला. मला का शोधत आहात, अशी विचारणा करत त्‍याने साफसफाईसाठी वापरण्‍यात येणारे औषध प्राशन करून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड येथील मोहननगर चौकीत गुरुवारी…

एकाला धडा शिकविण्यासाठी 5 जणांच्या वाहनांची तोडफोड; फरासखाना पोलिसांनी केली 6 जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

एकाला धडा शिकविण्यासाठी 5 जणांच्या वाहनांची तोडफोड; फरासखाना पोलिसांनी केली 6 जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

पुणे :बिबवेवाडी येथे झालेल्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर येरवडा आणि फरासखाना येथे गुरुवारी पहाटे वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी एकाला मारहाण झाल्याने त्याला धडा शिकविण्यासाठी टोळक्याने त्याच्या गाडीसह एक रिक्षा आणि ४ दुचाकीची तोडफोड करणारी घटना कागदीपुरा येथे घडली. याबाबत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसह ६ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले…

पुण्यातील पोलिस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात टायगर पॉईंट येथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, घटनेने पोलीस दलात खळबळ

पुण्यातील पोलिस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात टायगर पॉईंट येथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, घटनेने पोलीस दलात खळबळ

पुणे : पुण्यातील खडकी येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस उप निरीक्षकाचे नाव आहे. मागील ३ दिवसांपासून गुंजाळ हे ड्युटीवर नव्हते. लोणावळ्यातील टायगर पॉईंट लगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या ठिकाणी गुंजाळ यांची गाडीही आढळून आली…

पत्नीच्या माहेरी जाऊन केलेल्या हल्ल्यात 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यु; वडिलांना जन्मठेपेची शिक्षा

पत्नीच्या माहेरी जाऊन केलेल्या हल्ल्यात 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यु; वडिलांना जन्मठेपेची शिक्षा

पुणे :चारित्र्याचा संशय घेत असल्याने पत्नी रागावून मुलासह माहेरी निघून जाते. तेव्हा तिला भेटायला गेलेल्या पतीने दोघांवर धारदार हत्याराने वार केले. त्यात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला होता. मुलाच्या खुन प्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली योगेश परसराम बसेरे (रा. पठारे वस्ती, कदम वाक वस्ती, ता. हवेली, मुळ रा. अकोला)…

पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे पुतण्याने काकाचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन केला खुन; धक्कादायक कारण आलं समोर

पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे पुतण्याने काकाचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन केला खुन; धक्कादायक कारण आलं समोर

पुणे : पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे पुतण्याने काकाचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन खुन केल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. महेश जयसिंग तुपे (वय ५८) असे खुन झालेल्या काकाचे नाव आहे. तर, शुभम महेंद्र तुपे असे पुतण्याचे नाव आहे. ही घटना पाषाणमधील कोकाटे गल्ली शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. महेश तुपे हे बँकेतील मुदत ठेवीचे…

पूर्ववैमनस्यातून महाविद्यालयीन तरुणावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; केशवनगरमधील घटनेत चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून महाविद्यालयीन तरुणावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; केशवनगरमधील घटनेत चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पूर्वी झालेली भांडणे मिटल्याचे सांगितल्यानंतरही चौघा जणाच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत अथर्व संतोष जाधव (वय १८, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक गुमाने (वय २३), अक्षय गागडे (वय २४), गणेश जाधव (वय २४), वैभव थोरात…

किरकोळ वादातून पोटच्या 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; पतीवरही कोयत्याने वार, दौंड मधील धक्कादायक घटना

किरकोळ वादातून पोटच्या 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; पतीवरही कोयत्याने वार, दौंड मधील धक्कादायक घटना

पुणे : दौंड तालुक्यातून अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. शंभू दुर्योधन मिढे (वय-१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय -३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती…

‘मला राक्या भाई म्हणतात, मला पैसे मागतोस का’; सराईत गुन्हेगाराने दुकानदारांना धमकावून पसरविली दहशत

‘मला राक्या भाई म्हणतात, मला पैसे मागतोस का’; सराईत गुन्हेगाराने दुकानदारांना धमकावून पसरविली दहशत

पुणे : हॉटेलमधून चिकन राईसचे पार्सल घेतल्यानंतर हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर मला राक्या भाई म्हणतात, मला पैसे मागतोस का असे म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करायला धावून गेला. हवेत हत्यार फिरवून धमकी देत दहशत पसरविल्याचा प्रकार मांजरी येथे घडला. याबाबत राहुल अंबादास भोवाळ (वय ३१, रा. सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन…