केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण
पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीये. पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच पुण्यात आता केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यावरही कुख्यात गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या…