कर्ण कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई; 22 बुलेटचे सायलेन्सर काढले
पुणे : शहरात कर्ण कर्कश्य आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणार्या वाहनचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम उघडली. त्यात २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त…