पोलीस असल्याची बतावणी करुन मसाज थेरपिस्टला धमकावून लुबाडले
| | | | |

पोलीस असल्याची बतावणी करुन मसाज थेरपिस्टला धमकावून लुबाडले

पुणे – गे अ‍ॅपद्वारे संपर्क साधून मसाजसाठी घरी येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल न करण्यासाठी एटीएममधून २५ हजार रुपये काढायला लावून धमकावून पैसे घेऊन मसाज थेरपिस्टला लुबाडले. याबाबत एका २७ वर्षाच्या तरुणाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन समीर बेगमपूर असे नाव सांगणार्‍याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पर्वती पायथा येथे…

पोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पळून गेलेला कैदी 11 वर्षानंतर जेरबंद
| | | | | |

पोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पळून गेलेला कैदी 11 वर्षानंतर जेरबंद

पुणे – कर्नाटकात पोलीस अंमलदारांचा खून केल्यानंतर शिक्षा भोगत असताना विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून पळून गेलेला कैदी तब्बल ११ वर्ष पुणे व परिसरात लपून रहात होता.फुरसुंगी पोलिसांनी अशा फरार झालेल्या कैद्याला पकडले आहे. तीन महिन्यांपूर्वी फुरसुंगी पोलिसांना अशा एक कैदी गंगानगर परिसरात रहात असल्याची टीप मिळाली होती. पण त्याचा चेहरा अथवा अन्य काही माहिती मिळत नव्हती….

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे टोळके जाळ्यात; 4 आरोपींकडून 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त
| | | | | |

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे टोळके जाळ्यात; 4 आरोपींकडून 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त

पुणे – नागपूरहून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या आंतर जिल्हा तस्करांना वाघोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. नागेश सुनिल लष्करे (वय 20), सौरभ नामदेवराव तपासे (वय 22, रा. नागपूर), रिझवान इस्माईल शेख (वय 39) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबरील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले…