यामाहा कंपनीची चोरलेली दुचाकी पोलिसांनी केली जप्त; आरोपीला अटक
पुणे – शहरातील भारतीय विद्या पीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेली यामाहा कंपनीची दुचाकी पुणे पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चोरीचा हा प्रकार कात्रज चौकातील उषानगर येथे १६ एप्रिल २०२५ रोजी घडला होता. यामाहा कंपनीच्या दुचाकीची विक्री करण्याच्या उद्देशाने एकजण ती फिरवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली….