चिंतामणी विद्या मंदिर थेऊरचा दहावीचा निकाल ९४.४% – विद्यार्थ्यांचा शानदार यशोदय.
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने यावर्षी ९४.४% निकालाची घवघवीत कामगिरी नोंदवली आहे. या परीक्षेसाठी एकूण ८७विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ३ विद्यार्थी गैरहजर राहिले तर ८४विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण…