चिंतामणी विद्यालय, थेऊर येथे मोफत शालेय साहित्य वाटपाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात; विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक स्वागत
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) – चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे औपचारिक उद्घाटन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्य वाटप करून करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोम, आत्मविश्वास आणि शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली आहे. या उपक्रमाची संकल्पना यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सुभाष…