भिल्ल समाजाला नवा अधिकार : थेऊर व नायगाव येथील कुटुंबांना प्रथमच जातीचे दाखले
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर प्रतिनिधी: थेऊर व नायगाव येथील भिल्ल समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या समाजाला जातीचे दाखले मिळाले असून, एकूण २०० कुटुंबांना अधिकृत प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. गेल्या पन्नास वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेला भिल्ल समाज मासेमारी व पारंपरिक वाद्य वाजविणे या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत होता. मात्र शासनाच्या योजनांचा लाभ न…